नागपूर :- “तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दुंगा” भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला उत्पन्न करणारी घोषवाक्य देणारे भारत मातेचे वीर सुपुत्र महान स्वातंत्र्य सैनानी, थोर क्रांतीकारक, भारतरत्न, देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदु हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे शुक्रवारी (ता.२३) अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी मुख्य अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, सहाय्यक आयुक्त श्याम कापसे, कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सर्वश्री प्रमोद हिवसे, जितेश धकाते आदींनीही पुष्पांजली अर्पण केली. तत्पूर्वी मनपातर्फे मानसचौक स्थित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.




