– नाटककार ‘राम गणेश गडकरी, महान व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांना परेड व मानवंदना, वार्षिक महोत्सव निमित्त विविध स्पर्धा
खापा :- महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ कला महाविधालय, सिरोंजी येथे वार्षिक महोत्सव २०२६ अंतर्गत, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, महाराष्ट्राचे थोर नाटककार ‘राम गणेश गडकरी, महान व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांना परेड व मानवंदनेने अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन सैनिक तथा शाळेचे माजी विद्यार्थी राजेंद्र आत्राम उपस्थित होते. माजी विधार्थी संघाचे कोषाध्यक्ष अतुल तिबोले यांच्या हस्ते क्रिडास्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप भोंडे यांच्या मार्गदर्शनात विद्यालयात स्वयंशासन संगीत खुर्ची, आनंद बाजार, कुंकू टिकली, गणी बॅग स्पर्धा, स्लोसायकलिंग यासारख्या विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. वर्ग बारावी व वर्ग दहावी च्या विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियान व गैरमार्ग मुक्त परीक्षा व तणाव मुक्त परीक्षा अभियानांतर्गत शपथ देण्यात आली.
परेड व मानवंदना यामध्ये सहाय्यक शिक्षक आर बी टेकाळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती रवींद्र आहाके, रवींद्र क्षीरसागर, सुरज निकोसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किसना सहारे, सदस्य ओमेश भिमटे, दिनेश उईके, किशोर बोरिवार, राम भोयर, विकास बगमार, मयूर सहारे, संजय गिरमेकर तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोबतच माजी विद्यार्थी संघाच्या मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. माजी विद्यार्थी संघ सभेमध्ये डी. जे. चौधरी, डी. जे. नारे, हजारे, डी. जे. दळवी, वाय. बी. बुऱ्हान, बी. एन. पर्वत, पूजा दहिकर मारुती सोमकुवर, शुभम चटकवार, कुंदा बाजनघाटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन विजय काळमेघ यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार आर. बी. टेकाळे यांनी मानले.




