कामठी :- महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी चे उपाध्यक्ष व कामठी मौदा विधानसभा कांग्रेस चे नेता सुरेश भोयर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून इरशाद शेख पूर्व महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक कॉन्ग्रेस मित्र परिवार द्वारा कामठी येथे आयोजित भव्य मोफत रोग निदान शिबिरात शेकडो च्या वर संख्येतील नागरिकांनी लाभ घेतला व मोफत रोग निदान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.शिबिराला लाइफ लाईन हॉस्पिटल च्या वैद्यकीय चमूने विशेष आरोग्य सेवा पुरविली.
या शिबिरात येणाऱ्या समस्त नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषध वितरित करण्यात आली तसेच शस्त्रक्रियेची शक्यता असलेल्या नागरिकांची शस्त्रक्रियेची सोय करण्यात आली.
या मोफत रोग निदान शिबिराचे उदघाटन माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या करण्यात आले, याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत अंसारी, कांग्रेस कामठी शहराध्यक्ष रमेश दुबे, धीरज यदव, मीर आरिफ अली, मोबीन अहमद, इदरीस नागानी, अरशद कमाल, साजिद अंसारी ममता कांबळे, राजेश कांबळे, शाहेदा कलीम अंसारी, साजिद कमाल, कर्रार हैदर, एहतेशाम सहजाद, फारुक कुरैशी, अभय गेडाम,सुरैया बानो, सिराज भाटी, मुहम्मद सलमान, तौसीफ फैजी, तौसीफ खान, आनंद खोबरागड़े,इरफान अहमद, फरमान खान, अम्मार कुसुम खोबरागड़े, अंसारी,इशरत खान, परवीन बानो, रुक्मणि फर्नांडिस, वासिफ अंसारी, आतिफ हुजैफ आदि पधाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते.




