spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नवेझरी परिसरात पट्टेदार वाघाची दहशत, शेळीच बनली शिकार गावात भीतीचे वातावरण

गोंदिया :-  तिरोडा तालुक्यातील नवेझरी परिसरात पट्टेदार वाघाच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वीच कुलपा गावातील दीपक मरकम या शेतकऱ्याच्या गायीला पट्टेदार वाघाने आपले शिकार बनवले होते. आणि आज नवेझरी गावाच्या जवळपास दुपारच्या दरम्यान काही नागरिकांना वाघाचे चक्क दर्शन झाल्याने नागरिकात भितीचे वातावरण दिसुन येत आहे . याच वाघाने आज दुपारी चक्क तुलाराम कापगते यांच्या शेळीला आपले शिकार बनवले आहे. नवेझरी आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील गावातील नागरिक आणि शेतकरी त्यांच्या शेतात जाऊन पाळीव प्राणी चरण्यास घाबरत आहेत. वाघाच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकही घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. वाघाच्या दहशतीमुळ नवेझरी गाव परिसरातील लोकांमध्ये भीती वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. वाघाची दहशत पाहून परिसरातील नागरिकांनी वन विभागाने याकडे लक्ष देऊन वाघाचा बंदोबस्त करावा अशी नवेझरी परिसरातील नागरिक करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.