spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

धाकट्या भावाची हत्या? हत्येचे कारण गुलदस्त्यात

– आकस्मिक मृत्यू नसून खून, वैद्यकीय अहवाल

– मानकापूर ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल, हत्येचे कारण अज्ञात

– भाऊ आणि वहिणीला 19 पर्यंत पीसीआर

नागपूर :- मानकापूर ठाण्याअंतर्गत एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला. सुधीर खंडारे (40) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. वैद्यकीय अहवालात आकस्मिक घटना नसून हत्या असल्याचे म्हटले आहे. यावरून पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याची नोंद करून दोन भाऊ आणि वहिणी अशा तिघांना अटक केली. न्यायालयाने तिघांनाही 19 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

योगेश खंडारे (55), त्याची पत्नी रुपा खंडारे (52), योगेशचा भाऊ राजेश अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मृतक सुधीरची आई कौशल्या खंडारे (70) रा. शिवनगर, मानकापूर यांचीही भूमिका संशयास्पद आहे. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यांनाही अटक करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भावाची हत्या का आणि कशासाठी केली असेल, या प्रश्नाचे उत्तर पोलिस शोधत आहेत.

आरोपी योगेश हा प्रापर्टी डिलरचे काम करतो. त्याला एक मुलगा आहे. आरोपी राजेश दिव्यांग आहे. योगेशची पत्नी गृहीनी तर त्याची आई वयोवृध्द आहे. घटनेच्या दिवशी म्हणजे 2 सप्टेंबरच्या मध्यरात्री ते सकाळी 7 वाजेदरम्यान सुधीरचा संशयास्पद मृत्यू झाला. सुधीर त्यांच्या राहाते घरी बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडून होता. सुधीर हा बाथरुममध्ये घसरून पडला. त्याच्या डोक्याला नळ लागल्याने तो जखमी होवून त्याचा मृत्यू, अशी माहिती खंडारे कुटुंबायांनी पोलिसांना सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

दरम्यान सुधीरच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय अहवालात सुधीरचा मृत्यू आकस्मिक नसून त्याची हत्या करण्यात आल्याचे म्हटले आहे. वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. चौकशी दरम्यान घटनेच्या दिवशी खंडारे यांच्या घरी बाहेरील एकही व्यक्ती आला नाही. तसेच घरातील एकही सदस्य बाहेर गेला नाही. त्यामुळे पोलिसांनी कुटुंबीयांवर संशय व्यक्त करून तिघांना अटक केली. सुधीरच्या आईचे बयान नोंदविले. दोन्ही भावांची सुध्दा चौकशी केली. मात्र, कुटुंबातील एकही सदस्य समाधानकारक उत्तर देत नाही. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे सकारात्मक सहकार्य मिळत नाही, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीष काळसेकर यांनी सांगितले. दरम्यान पोलिसांनी वस्तीतील लोकांकडूनही माहिती घेतली. एकंदरीत कुटुंबावर पोलिसांचा संशय आहे. परंतु हत्येचे कारण स्पष्ट होत नाही.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.