राज्याचे मुख्यमंत्री व महसूलमंत्री बावनकुळेंना कोतवालांची विनवणी, गरिब कोतवालांना चतुर्थश्रेणी बहाल करा 

0
123

– महसूल सेवकांना (कोतवालांना) चतुर्थ श्रेणीतील दर्जा देण्याची मागणीसाठी आंदोलन सुरूच !

– राज्यातील महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळाल्याशिवाय महसूल सेवकांचे आंदोलन थांबणार नाही

– कोतवालांना शासनाने चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या – अध्यक्ष रवींद्र बोदेले

राज्याचे मुख्यमंत्री व महसूलमंत्री बावनकुळे यांना गरीब कोतवालांची विनवणी कोतवालांना चतुर्थश्रेणी बहाल करा :

नागपूर :- विदर्भ महसूल सेवक (कोतवाल) संघटने च्यावतीने पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले की, महाराष्ट्रातील राज्यातील महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा महसूल सेवक (कोतवाल) शासन स्तरापासुन ते गाव पातळीवरील महत्त्वाच्या योजना व्यवस्थित रित्या पोहोचविण्यासाठी राज्यातील महसूल यंत्रणा जिल्हाधिकारी ते महसूल सेवक (कोतवाल) स्तरापर्यंत कार्यरत असते. अभियान मोहिमांचे समन्वय, आपत्ती टंचाई, जनगणना, निवडणुका राजशिष्टाचार, विविध जात प्रमाणपत्राचे देणे अशा अनेक बिगर महसूली कामाची जबाबदारी महसूल विभागावर असते. परंतु शासनाने अद्यापपर्यंत महसूल सेवक (कोतवाल) पदास शासनाच्या वर्गीय कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा सुविधा लागू केलेल्या नाही. त्यामुळे शासकीय सेवा करीत असताना महसूल सेवकांवर (कोतवाल) यांना खूप अन्याय सहन करावा लागत आहे. सोमवारी 15 सप्टेंबर च्या रोजी राज्यातील सर्व महसूल सेवक विदर्भ संघटनेचे सर्व पदाधिकारी मुसळधार पावसात व विजेच्या कडकडाट तमाम व जीवाची परवा न करता आपल्या मागण्यांसाठी संविधान चौकात आंदोलनावर बसलेले आहेत परंतु या महसूल सेवकांना चतुर्थश्रेणीचा दर्जा अद्यापही सरकार मान्य करत नसल्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेत भव्य आंदोलन करणार असल्याची माहिती दिली.

महसूल सेवक (कोतवाल) पदाचे महसूल यंत्रणेतील स्थान आणि कार्य लक्षात घेता महसूल सेवकांना इतर महसूल कर्मचाऱ्यांना प्रमाणे शासकीय सेवा सुविधा देण्यासाठी चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन महसूल सेवक कर्मचारी यांच्यावरील अन्याय दूर करावा अन्यथा सर्व महसूल सेवक आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली. ऊन, वारा, पाऊस, आला तरी पण राज्यातील महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळाल्याशिवाय महसूल सेवकांचे आंदोलन थांबणार नाही. हे सुद्धा पत्रकारांना सांगितले.

यावेळी अध्यक्ष रवींद्र बोदेले, कार्याध्यक्ष मंगेश जांभुळकर, योगेश शेडमाके राज्य उपाध्यक्ष, गोपालभाऊ ठवरे राज्य उपाध्यक्ष, सरचिटणीस दीपक रेवतकर, सचिव स्वराज्य जिलठे, कालिदास गेडाम, सुनील नागापुरे, महादेव शिवणकर, अशोक भोसकर, उत्तम पाचभाई जिल्हाध्यक्ष यवतमाळ आणि आदिनाथ कुमरे यांच्या उपस्थितीत परिषद घेऊन व पत्रकारांना माहिती दिली.