spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांचे चित्र झळकणार दिल्लीमध्ये

सचिन चौरसिया रामटेक :- स्वामी विवेकानंद सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नागपूर येथील लोकमत भवन च्या दरडा आठ गॅलरीमध्ये आयोजित गोंड चित्रशैलीच्या प्रदर्शनात सहभागी होऊन आपल्या चित्रांद्वारे उपस्थित यांचे आणि परीक्षकांचे मन मोहून घेतले. या प्रदर्शनामध्ये विद्यालयातील एकूण ११ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या त्यातून आसावरी असोले या विद्यार्थ्यांच्या चित्राची दिल्ली येथे होणाऱ्या चित्र प्रदर्शनासाठी निवड झालेली आहे. या चित्रप्रदर्शनांमध्ये विद्यालयातील सात विद्यार्थिनींच्या चित्रांना उत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे. या सात विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. विद्यालयाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यालयाचा सुद्धा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. हे पारितोषिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जयंत देशपांडे यांनी स्वीकारले, यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षिका रेणुका देशपांडे विद्यालयातील जेष्ठ शिक्षक ईश्वर साखरवाडे, सुनील वेळेकर, माजी मुख्याध्यापक जगन्नाथ गराट प्रामुख्याने उपस्थित होते. देवलापार सारख्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचे चित्रकलेचे शिक्षण घेतलेले नसताना फक्त विद्यालयातील शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या आधारे एवढे नेत्रदिपक यश मिळविलेले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयंत मुलमुले, कार्यवाह प्राचार्य डॉक्टर अरविंद जोशी यांनी विशेष कौतुक केले तर विद्यालयामध्ये सर्व शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पालकांनी व देवलापार परिसरातील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व विद्यालयाच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.