नाग
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगरांना घटनेमध्ये एसटी आरक्षण दिलेले आहे. परंतु महाराष्ट्र सरकार त्याची अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे समाज एसटी आरक्षणापासून वंचित आहे. आयुष्यातील शेवटचा आरक्षण लढा 21 जानेवारी 2026 रोजी मुंबई येथील आझाद मैदानात उभारण्यात येईल. देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यास लाखो धनगरा समोर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करू व पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगरांना एसटी आरक्षण देऊ असे आश्वासन 2013 मध्ये दिले होते. त्यांनी आपला शब्द पाळावा व धनगरांना एसटीचे प्रमाणपत्र द्यावे असे आवाहन दीपक बोराडे यांनी नागपूर येथील मेळाव्यासमोर सरकारला केले. जालना येथे धनगर एसटी आरक्षणाकरीता आमरण उपोषण करणारे संघर्ष यौध्दा दिपकभाऊ बोराडे यांच्या विदर्भ दौ-यात ते नागपूर येथे आले असता त्यांचे धनगर युवक मंडळ नागपूर, धनगर अधिकारी कर्मचारी संघटना व सकल धनगर समाजाच्या वतीने त्यांचे युवक मंडळाचे कार्यालय, प्लॉट नं. 161, स्वाती अपार्टमेंट, मानेवाडा रोड, नागपूर येथे भव्य स्वागत करण्यात आले. श्री बोराडे यांनी आंदोलनाची भूमिका समजावून सांगितली. मागील आंदोलनामध्ये धनगर समाजाची कशी फसवणूक करण्यात आली याची माहिती अनिल कुमार ढोले यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात दिली व त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी असे आंदोलन कर्त्यांना आवाहन केले. मुंबई येथे होऊ घातलेल्या त्यांच्या आंदोलनाला सकल धनगर समाज नागपूरच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. कार्यक्रमाला, पुरुषोत्तम डाखोळे, रमेश पाटील, अनिल कुमार ढोले, देविदास आगरकर, गणेश पावडे, अशोक पातोंड, रामदास माहुरे, नामदेव खाटके, अशोक सांभारे, शितल चामाटे, लोंढे, होमेश भुजाडे, त्रिलोकचरण खरबडे, मोरे, घोडे, अरविंद पावडे, उज्वल रोकडे, उत्तम चिव्हाने, यशवंत कातरे, लक्ष्मण रोकडे, एड.गुणवंत गोडे व इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.








