नागपुर १२: नागपुर शहरात गेल्या तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना मदत देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा नागपूर शहर जिल्हा कॉग्रेस पक्षाचे सरचिटणीस अँड.यशवंत मेश्राम यांनी दिला. आज त्यांनी पालकमंत्री तथा महसुलमंत्री बावनकुळे व जिल्हाधिकारी, नागपूर यांना भेटून मागण्यांचे निवेदन सोपविले. गेल्या वर्षी 20 जुलै 2024 रोजी झालेल्या नुकसानीची अध्याप भरपाई देण्यात आली नाही. तसेच छोटया दुकानदारांनाही त्यावेळी घोषित केलेली मदत अध्यापही देण्यात आलेली नाही. मागील वर्षी घोषित केलेली मदत व नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे व मदत तातडीने देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे. शिष्टमंडळात वसंत साने, स्मिता अडिकणे, निलेश चिंचखेडे, संदीप गजभिये, सिध्दार्थ गजभिये, विठठल देशमुख, अतिश खेळकर, अहमदभाई व मो. इद्रिस आदी अनेकांचा समावेश होता.
पुरग्रस्तांचे तातडीने पंचनामे करा अन्यथा तीव्र आंदोलन ! यशवंत मेश्राम


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



