गडचिरोली :- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, भारतीय आदिवासी परिषद, आदिवासी दलित एकता परिषद आयोजित जननायक बिरसा मुंडा यांच्या दीडशे व्या जयंतीमहोत्सव व भारतीय संविधान अमृत महोत्सव निमित्ताने आदिवासी जनचेतना महासंमेलनाचे आयोजन येत्या 15 व 16 नोव्हेंबर रोजी, करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ९ वाजता. बिरसा मुंडा, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून उद्घाटन संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेश माने यांच्या शुभहस्ते होईल. या कार्यक्रमात मुख्य अतिथी पाहुणे संभाजी सरकुंडे, ए. झेड. खोब्रागडे आणि खासदार उमेश पटेल यांची उपस्थिती राहील अशी माहिती पत्रकारांना दिली. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून लोकेंद्र सिंग ,भारतीय आदिवासी परिषदेचे अध्यक्ष लटारी मडावी व रोहिदास राऊत यांची उपस्थिती राहतील. दुपारी त्याच दिवशी जाहीर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 16 नोव्हेंबर रोजी जाहीर चर्चासत्राचे आयोजन आदिवासी – दलित संघर्ष -राजकारण व भवितव्य यावर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
बी आर एस पी – नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, निवडणूक समविचारी पक्षासोबत येऊन लढविणार आहे. असे पत्रकार परिषदेमध्ये ॲड. माने यांनी सांगितले.
आदिवासी समाज बांधवांनी बिरसा मुंडा व संविधानाच्या वैचारिक क्रांतीसाठी हजारो संख्येने उपस्थित राहावे. या संमेलनात अनेक आदिवासी विचारवंत, विषयतज्ञ, अनुभवी कार्यकर्ते मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम राजीव गांधी सभागृह इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे 15 व 16 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.
पत्रपरिषदेत एड.डॉ.सुरेश माने, एड.भीमराव शेंडे व समन्वयक डॉ.विनोद रंगारी यांची उपस्थिती होती.




