किशोर साहू, मौदा :- येत्या 28 एप्रिल ला मौदा तालुक्यातील पोट निवडणुकीचे मतदान होणार असून, ग्रामपंचायत खरडा व तारसा येथे प्रत्येकी एका ग्रामपंचायत सदस्य पदाकरिता दोन्ही ग्रामपंचायत मध्ये सरळ लढत होणार असून, खरडा येथील सरपंचा वैशाली मुरलीधर तांबुलकर यांचे समर्थक वार्ड क्रमांक 2 चे नवीनच उमेदवार मनोज तांबुलकर (बॅट), तर उपसरपंच वसंता भाजीपाला यांचे समर्थकही नवीनच उमेदवार मधुकर तांबुलकर (सिलेंडर) यांच्यात सरळ लढत शांततेत(रविवार 26 एप्रिल पर्यंत) होत आहे.
ग्रामपंचायत तारसा येथे उपसरपंच चंद्रशेखर गभने यांचे वार्ड क्रमांक 4 चे समर्थक नवीन उमेदवार सचिन कमाले (ट्रॅक्टर) विरुद्ध अनुभवी माजी ग्रामपंचायत सदस्य ओमप्रकाश डांगरे(बॅट) यांच्यात शांततेत सरळ लढत होत आहे.
दोन्ही ग्रामपंचायत मध्ये प्रत्येकी एका ग्रामपंचायती सदस्य पदाकरिता शांततेत निवडणूक होत असली तरी खरडा येथे सरपंचा वैशाली मुरलीधर तांबुलकर, सरपंचाचे पती व सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर तांबुलकर, उपसरपंच वसंता भाजीपाला, माजी सरपंच नथ्थू भिवगडे, ग्रामपंचायत तारसा येथील उपसरपंच चंद्रशेखर गभणे यांच्या उमेदवाराच्या बॅनर वर फोटो असल्याने त्यांच्याही प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत, हे विशेष!

