spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

निलज (खंडाळा )येथे उद्या साप्ताहिक बाजाराचे उद्घाटन समारंभ 

कोदामेंढी :- मौदा तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या पारशिवनी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या निलज (खंडाळा) येथे बुधवार (ता. 18 मार्च)पासून आठवडी बाजार सुरू होत आहे. या आठवडी बाजाराचे उद्घाटन समारंभ 18 मार्चला दुपारी चार वाजता होणार आहे.

या आठवडी बाजाराच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांना संधी मिळावी व जनतेला फायदा व्हावा जेणेकरून गावातील पैसा गावातच राहील तसेच ताजा भाजीपाला व इतर सामग्री उत्तम भावात विकला जाईल. खरीदाराला पण ताजा , उत्तम भाजीपाला व इतर सामुग्री मिळेल असा उद्देश असल्याचे साप्ताहिक बाजार समितीचे अध्यक्ष भरत चकोले, उपाध्यक्ष नागेश्वर कारेमोरे, कार्याध्यक्ष राजेश चकोले, सचिव भीमराव मेश्राम, सदस्य रामचंद्र चकोले, मूलचंद खंडाते ,प्रदीप खंडारे, सुनील कारेमोरे ,जीवन कारेमोरे ,रोमन पाहुणे, मनोज रोहणे यांनी सांगितले. तरी या साप्ताहिक बाजाराच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत निलज तर्फे करण्यात आले.

Popular Articles