spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मौदा येथील सर्वज्ञ चक्रधर स्वामी द्वीप येथे महानुभाव विचार मंच महोत्सव 

किशोर साहू, मौदा :- सर्व धर्म समभाव सामाजिक सेवा महानुभव विचार मंच महोत्सव नुकतेच सर्वज्ञ चक्रधर स्वामी द्वीप मौदा येथे थाटात पार पडले. या कार्यक्रमात पूज्यनीय डॉ. महंत सवंत्सकर बाबा महानुभव,महानुभव संचालक श्रीकृष्ण मंदिर,चिखली, जिल्हा बुलढाणा यांनी आपल्या प्रवचनातून मोलाचे मार्गदर्शन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

उत्सव समिती व आयोजक समितीच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले.या प्रसंगी प्रसन्ना उर्फ राजा तिडके नगराध्यक्ष, नगरपंचायत मौदा,देवेंद्र गोडबोले माजी जिल्हा परिषद सदस्य, महेश कलारे माजी सरपंच, विनोद कोपरकर भाजपा किसान आघाडी नागपूर (ग्रामीण )जिल्हामंत्री, देवरावजी करडभाजणे अध्यक्ष,लक्ष्मण काळे सामाजिक कार्यकर्ता, सुभाष ढगे,नरेश मोटघरे,.मोरेश्वर सोरते,राहुल पोटभरे, राजु सोमनाथे, सुरेश काळे,रोहित काळे व मोठ्या प्रमाणात असंख्य भक्तगण उपस्थित होते.

Popular Articles