spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अविवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या

कामठी :- कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा रहिवासी एका अविवाहित तरुणाने राहत्या घरातील खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सकाळी साडे अकरा दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव सुमित सुभाष वासनिक रा. सोनेगाव राजा असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा अविवाहित असून घरमंडळी घराबाहेर बसले असता सदर तरुणाने अज्ञात कारणावरून राहत्या खोलीतच गळफास लावून आत्महत्या केली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळा चा पंचनामा करून पुढील उत्तरीय तपासणी साठी मृतदेह शवविच्छेदन गृहात हलवून मृतकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.

Popular Articles