spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चौधरी हॉस्पिटल ते चंद्रमनी मार्गावर स्पीडब्रेकर लावा-नगरसेवक अनिल सूर्यवंशी

कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 4 येथील चंद्रमनी नगर ते चौधरी हॉस्पिटल पर्यंत चा मार्ग हा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा मार्ग आहे.या मार्गावर लोकवस्ती असून नागरिकांची वर्दळ निरंतर सूरू असते त्यातच या मार्गाने भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनापासून अपघाती घटनेस निमंत्रण ठरत आहे.या मार्गावर दररोज किरकोळ अपघात घडत असतात तेव्हा या दैनंदिन घडणाऱ्या अपघाती घटनेत कुणाची जीवितहानी होऊ नये व वाहतूक सुरळीत व नियंत्रणात राहावे यासाठी या मार्गावर लवकरात लवकर स्पीडब्रेकर लावण्यात यावे अशी मागणी नगरसेवक अनिल सूर्यवंशी यांनी खासदार श्यामकुमार बर्वे तसेच मुख्याधिकारी विनोद जाधव यांना दिलेल्या सामूहिक निवेदनातून केली आहे. निवेदन देताना प्रमोद बेलेकर, अरविंद मेश्राम, अतुल राऊत,नरेंद्र वाघमारे, अनित्य बेलेकर,तनय खोब्रागडे, अमित खोब्रागडे, आकाश खोब्रागडे, पियुष मेश्राम, प्रज्वल दुरबुडे आदी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.