नागपूर :- किसान मेळावा 2025-26 चे आयोजन CITI CDRA मार्फत ऍग्रो व्हिजन, नागपूर विद्यापीठ परिसर येथे दिनांक 24/11/2025 ला आयोजित करण्यात आले.
कार्यशाळेला प्रकल्पातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यातून 150 हून अधिक शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली.डॉ. सीडी मायी, अध्यक्ष सल्लागार समिती, ऍग्रो व्हिजन फाउंडेशन, डॉ. बाबासाहेब फंड, वरिष्ठ शाखज्ञ CICR नागपूर रत्नदीप रामटेके सी आय सी आर, गोविंद वैराळे, प्रकल्प समन्वय, सिटीसिडीआरए म.रा. आदी मान्यवरांची उपस्थिती होती.जगदीश नेरलवार, प्रकल्प अधिकारी यांनी कार्यक्रमाचे समारोप केले.
कोरडवाहू शेतीसाठी नवीन कापूस तंत्रज्ञान HDPS, गुलाबी बोंड आळी साठी (PBW) बंधन तंत्रज्ञान आणि AI या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. सी डी मायी, अध्यक्ष यांनी कोरडवाहू शेतीसाठी सध्या ‘कापूस पीक हेच पर्याय आहे’ असे जाहीर केले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पीक व्यवस्थापन, कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन, लागवड पद्धती, बियाणांची निवड इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.
डॉ. बाबासाहेब फंड, वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी कापूस पिकावरील कीड व्यवस्थापन व त्याचे संरक्षण यावर मार्गदर्शन केले तसेच रासायनिक फवारणी करताना ज्या पिकांवर जे औषध सुचवलेली आहे, त्याचीच फवारणी करावी अन्यथा जमिनीत ड्रेचिंग करावयाची औषधे चुकीने शेतकरी फवारणीसाठी वापर करतात व त्याचे वाईट दुष्परिणाम आढळून येतात, यावर उदाहरणासह शेतकऱ्यांना संदेश दिला.
रत्नदीप रामटेके यांनी जमीन तयार करणे, गुलाबी बोंड अळी चे व्यवस्थापन, एकरी झाडांची संख्या याची उपयुक्त माहिती दिली.
गोविंद वैराळे, समन्वयक, यांनी एचडीपीएस लागवड, व्यवस्थापन, संकरित बियाणे निवड, उत्पादन वाढ, खर्च बचत, कपाशीला मिळणारा बाजार भाव या विषयी यावर मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात या CITI CDRA प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे सरासरी उत्त्पादन 12 ते 13 किंटल प्रति एकर प्राप्त झाले, हे आवर्जून सांगितले.
महाधन अॅग्री चे गहिनीनाथ ढवळे यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन, प्रभावी पोषक व्यवस्थापन समजावून सांगितले. अकोल्याचे प्रगतिशील शेतकरी दिलीप ठाकरे यांनी स्वतः एबडीपीएस पद्धतीने क्लस्टर बेसवर लागवड केल्यामुळे झालेले खर्चाची बचत स्वतःच्या अनुभवातून कथन केली.
दिलीप पाहणे हिंगणघाट यांनी 2024-25 मध्ये प्रति एकर तब्बल 24 किंटल कापूस उत्पादन साध्य केले. या विदर्भातील शेतकऱ्याची कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी कोईमतूर, तामिळनाडू येथे बोलावून त्यांची पाठ थोपटली. एकरी सहा बियाणे पॅकेट व आवश्यक मोजक्या फवारण्या, यामुळे कमी खर्चात अधिक उत्पादनाचे तंत्र शेतकऱ्यांना सांगितले. एकरी 25000
सरासरी झाडांची संख्या व 10 बॉड प्रति झाड असल्यास, 10 किंटल प्रति एकर उत्पादन निश्चित आहे, असे ठामपणे इतर शेतकऱ्यांना समजावून सांगितले. याकरिता त्यांनी सीआयसीआर व सिटी सीडीआरए चे आभार मानले.
वरोरा क्लस्टर मधील प्रगतिशील महिला शेतकरी श्रीमती संगीता महादेव खीरटकर तसेच नागपूर ग्रा. येथील शेतकरी राजू कुमरे यांचे शाल व श्रीफळ देऊन डॉ. सीडी मायी यांचे हस्ते सत्कार करण्यात आले.
कार्यशाळेनंतर उपस्थित शेतकऱ्यांनी ऍग्रो व्हिजन प्रदर्शनातील विविध स्टॉल्सला भेटी देत आधुनिक शेती यंत्रसामुग्री, विविध कंपन्यांच्या खतांचे स्टॉल्स, झायडेक्स ई. मायक्रोन्यूट्रिएंट्स, सूक्ष्म सिंचन, नाविन्यपूर्ण कृषी तज्ञांचे मार्गदर्शन आणि उत्पादन वाढीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान याची माहिती घेतली. एकाच छताखाली शेतकऱ्यांच्या शेतीशी उपयोगी सोयीसुविधा उपलब्ध करून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट या प्रदर्शनाचा केंद्रबिंदू आहे.
या उपक्रमाचे संयोजक आधारस्तंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असून ऍग्रो व्हिजन मधील येणारा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी “पारंपरिक शेतीला कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) जोड दिल्यास शेतकऱ्यांची प्रगती निश्चित आहे” असे प्रतिपादन केले.
आताच्या काळात पारंपरिक शेतीचे ज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाला मिळून शेती करण्याची गरज आहे, त्यातून शेतकऱ्यांचे एकीकडे उत्पादन खर्च कमी होऊन दुसरीकडे उत्पन्न वाढल्यास शेतकऱ्यांचा विकास होईल असे गडकरी यांनी शेतकऱ्यांना संबोधित करतांना सांगितले.




