spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

गडचिरोली :- संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या परिपत्रकान्वये शारिरीक आणि आध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्व विचारात घेऊन दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी साजरा करण्यात येतो. त्यानुसार दरवर्षी 21 जून हा दिवस गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन जिल्हा प्रशासन, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली, नेहरु युवा केंद्र, एन.सी.सी., जिल्यातील योग क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध योग संघटना, योगाशी निगडित विविध मंडळे, यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठाच्या प्रांगनात योग प्रात्यक्षीके व योग दिवस 21 जून, 2026 रोजी सकाळी 7.00 ते 07.45 या वेळेत जिल्ह्याच्या मुख्य कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील / गडचिरोली शहरातील सर्व नागरीक / महिला / युवक-युवती / क्रीडाप्रेमी / योगपटु / महाविद्यालयीन युवक-युवती / शालेय विद्यार्थी / विद्यार्थीनी / शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी / जिल्हा परिषद व शासनाच्या विविध विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी जास्तीत संख्येने मुख्य कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी, भास्कर घटाळे यांनी केले आहे.

Popular Articles