किशोर साहू,मौदा :- यंदा कोरड्या दुष्काळावर मात करण्यासाठी रामटेक व कामठी विधानसभा क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या रामटेक, कामठी, पारशिवनी व मौदा तालुका अंतर्गत येत असलेल्या गावांमधील नदी नाल्यांवर ताडपत्री बंधारे बनविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मात्र तारसा येथील बनविण्यात आलेला ताळपत्री बंधारा अल्पावधीतच फुटल्याने त्या बंधार्यात साचलेला पाणी बाहेर निघून गेलेला आहे. या बंधार्याची दयनीय अवस्था दाखवणारा व्हिडिओ माजी जि प सदस्य देवेंद्र गोडबोले यांनी स्वतःच्या स्टेटसवर ठेवून सोशल मीडियावर वायरल केलेला आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की, वरील चारही तालुक्यात ताडपत्री बंधारे बनविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत २ कोटी ७५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे तारसा येथील फुटलेल्या बंधाऱ्यासह इतरही बंधाऱ्याची संबंधित शासकीय विभागाने चौकशी करावी, अशी मागणी गोडबोले यांनी केली आहे.
Latest News
Related Posts
तारसा येथील फुटलेल्या ताळपत्री बंधाऱ्याची चौकशी करा: देवेंद्र गोडबोले






