Home Latest News लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक – एपीआय सचिन यादव

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक – एपीआय सचिन यादव

0
53

कामठी :- 31 ऑक्टोबर हा दिवस लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून कामठी येथे नवीन कामठी पोलीस स्टेशन व जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या वतीने (रन फॉर युनिटी ) एकता मार्च रॅली चे आयोजन करण्यात आले होते त्यात माजी सैनिक, शाळा, महाविद्यालय,शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, तसेच राजकीय पक्षाच्या लोकांनीही सहभाग नोंदविला.

याप्रसंगी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना एपीआय सचिन यादव यानी सांगितले की लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहेत .सरदारवल्लभभाई पटेल यांनी 560 हुन अधिक संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन केले, देशाचे केलेले राजकीय एकत्रीकरण आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्याचे काम त्यांनी केले.या रॅली मध्ये पोलीस स्टेशन चे समस्त अधिकारी कर्मचारी सह विद्यार्थी,गांवकरी, नागरिक सहभागी होते.सर्व सहभागीचे पोलीस अखिलेश ठाकूर यांनी आभार व्यक्त केले.