spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सर्वांसाठी शेतीच्या धोरणाबाबत हिवाळी अधिवेशनात धोरनात्मक शासन निर्णय निर्गमित करा

– बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांनी केली पत्र परिषदेतून मागणी : 

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहित महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडे केली अधिकृत मागणी:

– माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहित विरोधी पक्षाचे आमदार यांना मोर्चात सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठविनार असल्याचे पत्र परिषदेतून केले जाहीर 

नागपूर :- दलीत आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधानात्मक मार्गाने संघर्ष करणारी आशिया खंडातील पहिली क्रांतिकारी संघटना आणि त्या संघटनेच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा आयोजीत करून सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करून शेतीची अतिक्रमणे नियमित करण्यासाठी धोरनात्मक शासन निर्णय निर्गमित करावा यासाठी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहित विरोधी पक्षाचे आमदार संजय देरकर आ सुद्धार्थ खरात खा संजय देशमुख यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे पत्र परिषदेतून सांगितले तसेच आदिवासी समाजाच्या मालकी हक्क असलेल्या जमिनी गैर आदिवासी समाजाच्या लोकांनी बळकावल्या आहेत त्या जमिनी मूळ आदिवासीला परत करण्यासाठी परिपत्रक जारी करण्यात यावे तसे झाले नाही तर गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी आणि गैर आदिवासी यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचेच उदाहरण मौजे लगाम ता मुलचेरा येथील गैर आदिवासी प्रवीण व्यंकटस्वामी गोविंदवार यांच्या कब्जात मूळ आदिवासी असलेले रमेश पांडुरंग मडावी यांची जमीन आहे आदिवासी पांडुरंग हनुमंत मडावी यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जमिनीच्या मूळ दस्तावेजात मोठा बदल करून आदिवासीच्या जमिनीचा फेरफार करून घेतला त्याच्या सर्व कागद पत्राची सखोल चौकशी करण्यात आली नाही तर त्यासाठी सर्व कागद पत्राची तपासणी करण्यासाठी पालकमंत्री यानी समिती गठीत करावी तसेच लगाम येथील गैर आदिवासी प्रशांत निरमलवार यांच्या परिवारातील हनुमंता नानाजी निरमलवार यांना राहण्यासाठी आदिवासी समाजाच्या गंगा बुगा मडावी यांना मिठ मिरची च्या भावात फक्त राहण्यासाठी दिली होती परंतु त्याचे वारसदार प्रशांत निरमलवार यांनी पूर्ण जागेवर कब्जा केला असे अनेक प्रकरण गडचिरोली जिल्ह्यात आहेत त्यासाठी पुन्हा पुन्हा आदिवासी वर अन्याय होणार नाही त्यासाठी पालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रशासकीय बैठक आयोजित करून आदिवासीला न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा पत्र परिषदेला उपस्थित असलेले रमेश मडावी तुकाराम मडावी यानी केली तसेच वण हक्क प्रमाण पत्रा प्रमाणे सातबारा अभिलेखात नोंद करण्यात यावी असे विविध मुद्घे घेवून नागपूर हिवाळी अधिवेशनावर बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते जगदिश कुमार इंगळे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती क्रांतिवीर बाबुराव शेडमाके आदिवासी गोंड समाज संघटना अध्यक्षा सुरेखा माणिकराव शेडमाके यांनी दिली यावेळी सोमा गंगा मडावी तुकाराम विठू मडावी सुखदेव केशव मडावी नानाजी रामलू मडावी काशिनाथ शामराव सिडाम सुरेश सोमा मडावी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.