नागपूर :- ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर देश- विदेशातून येण्याऱ्या धम्मबांधव-भगिनींकरिता ३८-३९ वर्षांपासून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य सस्नेह-भोजनदान सोहळ्याचे आयोजन ज्योतिरामजी लोखंडे बहुउद्देशीय संस्था नागपूरद्वारा ०३ ऑक्टोबर रोजी शुक्रवारला सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत प्लॉट नं. ७/५ ज्योतिवृक्ष निवास, ज्योतीराम लोखंडे चौक, घाटरोड, नागपूर येथे करण्याचे ठरलेले असून संस्थेच्या वतीने समस्त धम्मबांधव-भगिनींना सहर्ष आमंत्रित करण्यात येत आहे असे राजु लोखंडे यांनी सांगितले आहे.








