– पहिले बक्षीस २० हजार रुपये
बेला :- जवळच्या मुरादपूर येथे जनकल्याणकारी समिती (नागपूर) व स्थानिक जयसेवा नवयुवक क्रीडा मंडळाचे संयुक्त विद्यमाने विलास येसनसुरे आणि शेषराव कुडमते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शुक्रवार १७ ऑक्टोबरला ६० किलो वजन गटातील एकदिवसीय कबड्डी सामन्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये २० हजार रुपयाचे पहिले बक्षीस असून द्वितीय बक्षीस १५ हजार रुपये, तृतीय ९ हजार तर चतुर्थ बक्षीस ५ हजार रुपये दिल्या जाणार आहे. याचा कबड्डी संघाने लाभ घ्यावा. असे आवाहन सूत्रांनी केले आहे.
सहभागी होणाऱ्या संघानी ८०० रुपये शुल्क भरून आपला प्रवेश नोंदवावा. रोख पुरस्कार शिवाय विजेत्यां संघांना शिल्ड देऊन सुद्धा गौरविण्यात येणार आहे. शुक्रवारला सायंकाळी ६ वा. मान्यवर पाहुण्यांचे हस्ते सामन्यांचे उद्घाटन होईल व सामने संपल्यानंतर लगेच बक्षीस वितरण केले जाईल. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष महावीर कुडमते, उपाध्यक्ष दीपक भोंडे, सचिव अविनाश लेवाडे, सहसचिव देवेंद्र पुरके, अमित चाफले, कोषाध्यक्ष मोहित सयाम, समीर कुडमते, पवना मसराम, तुषार लेवाडे, सुरज मडावी, अंकिता कुडमते, नेहाल सयाम, अंबर कुडमते, संतोष भगत, गणेश शेंडे, कैलास कुडमते, हनुमान कुडुमते, आशिष सयाम व अनेक युवक कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.




