केळापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षणामुळे मातब्बरांचा हिरमोड

0
59

– सौभाग्यवतींसाठी अनेकांची फिल्डिंग

सुरज बंडीवार, पांढरकवडा :- पंचायत समितीत सर्वसाधारण महिलेला तालुक्याच्या सभापतिपदाच्या खुर्चीवर बसण्याचा मान मिळणार असल्याने त्या पदासाठी इच्छुक असलेल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. पांढरकवडा पंचायत समिती सभापतिपदासाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण निघाले आहे. मिनी आमदारकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीसाठी सभापतिपदावर सर्वसाधारण महिलेला संधी मिळणार असल्याने जे गुडघ्याला बाशिंग बांधून तालुक्याचे राजकारण करणार होते. मात्र, त्यांचा अपेक्षाभंग झाल्या. बऱ्याच वर्षांपासून निवडणुका न झाल्याने गावपातळीवरील पुढारी जोमात आहेत. त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होतील असा अंदाज वर्तविला जात आहे. त्या दृष्टीने अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. केळापूर तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गट व ८ पंचायत समिती गणाचे आज आरक्षण पडले. आरक्षण जाहीर झाल्यानंतर तालुक्यात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये अनेक मातब्बर नेते मंडळीच्या सौभाग्यवती रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात काँग्रेस, भाजप, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) शिवसेना (ठाकरे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशीच पारंपरिक लढत होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

केळापूर तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गट व ८ पंचायत समिती गणातील आरक्षण सोडती पुढील प्रमाणे काढण्यात आल्या.

जिल्हा परिषद गट

१.मोहदा – अनुसूचित जमाती ST (महिला)

२.सायखेडा – अनुसूचित जमाती ST (महिला)

३.पहापळ – अनुसूचित जमाती ST

४.पाटणबोरी – अनुसूचित जमाती ST

पंचायत समिती गण

१.मोहदा – सर्वसाधारण (महिला)

२.करंजी (रोड) – अनुसूचित जमाती ST

३.उमरी (रोड) – अनुसूचित जमाती ST (महिला)

४.सायखेडा – ना.मा.प्र OBC

५.पहापळ – सर्वसाधारण

६.मांगुर्डा – ना.मा.प्र OBC (महिला)

७.बोथ – अनुसूचित जमाती ST (महिला)

८.पाटणबोरी – सर्वसाधारण (महिला)