संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 11:-दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पावसाळा ऋतूत मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचे सांगण्यात येते दरवर्षी पावसाळ्यात विज आंगावर पडून मृत्यू झाल्याच्या घटना ऐकीवास येतात तेव्हा सावधानता बाळगण्याच्या उद्देशाने कामठी तालुक्यात विजरोधक यंत्र बसविने गरजेचे आहे मात्र याबाबत प्रशासनाने गंभीरतेची दखल घेत शासनाकडे याबाबत कधीही प्रस्ताव न टाकल्याने राज्याचे म्हसुल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्षेत्रात येणारा कामठी तालुका विजरोधक यंत्राविना आहे.
मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या कालखंडात विशेषता माहे मे,जून व जुलै तसेच मान्सून पश्चात साधारणता माहे ऑक्टोबर या महिण्यात कामठी तालुक्यात विजेच्या कडकडाटा सह पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावतो त्यानुसार मागील वर्षी 9 जून ला कामठी तालुक्यातील जाखेगाव रहिवासी 42 वर्षीय रामराव आकरे नामक शेतकरी चा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला आहे तसेच यावर्षी बोरगाव येथील तरुण शेतकरी कैलास गोपाल प्रगट चा बकऱ्या चरवत असताना अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला तसेच एका 14 वर्षीय बालकाचा सुद्धा मृत्यू झाला आहे हे विसरता येत नाही.याप्रकारच्या अंगावर वीज कोसळल्याने मृत्युमुखी च्या दुर्घटना होत असतात .तेव्हा वीज पडण्याच्या घटनेतील जिवीतहाणी कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पावसाळ्याची सुरुवात ही नेहमीच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटा सह असते ही प्रक्रिया वातावरणातील बदलामुळे होत असल्याने अपरिहार्य आहे.कारण ही प्रक्रिया झाली नाही तर कदाचित पाऊसही पडणार नाही. अशात विजरोधक यंत्र बसविल्यास त्या परिसरात वीज पडण्याची घटना टाळून जिवीतहाणी टाळता येऊ शकते .तेव्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज कोसळून मृत्युमुखी पडण्याच्या घटनेला ब्रेक लागावा यासाठी कामठी तालुक्यात विजरोधक यंत्र बसविण्यात यावे अशी मागणी येथील जागरूक नागरीक करीत आहेत.





