spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

काटोल पोलिसांकडून सट्टापट्टीवर कारवाई, गुन्हा दाखल

काटोल :- काटोल पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, सरस्वती नगर गार्डनचे आडोशाला काटोल येथे राजेन्द्र गुलाबराव गायकवाड हा काही लोकांकडुन पैसे घेवुन सट्टापट्टीचे आकडे लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहचले असता सरस्वती नगर गार्डनचे आडोशाला आरोपी नामे राजेन्द्र गुलाबराव गायकवाड, रा. सरस्वती नगर काटोल हा कागदावर आकडे लिहुन सट्टापट्टी चालवित असतांना मिळुन आला. पोलीसांनी घटनास्थळावरून १) सट्टापटटी आकडे लिहलेला कागद २) नगदी ४७००/- रू ३) मोटोरोला कंपनीचा अॅन्रॉईड मोबाईल किंमती १०,०००/- असा एकुण १४७००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नमुद आरोपी राजेन्द्र गुलाबराव गायकवाड, रा. सरस्वती नगर काटोल याच्या विरूद्ध कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.