Home Latest News ‘सेवा परमो धर्मः’ हा मूलमंत्र केंद्रस्थानी ठेवून मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजना समाजात पोहोचवा

‘सेवा परमो धर्मः’ हा मूलमंत्र केंद्रस्थानी ठेवून मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजना समाजात पोहोचवा

0
8

– राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे आवाहन 

ग्रामगीतेतून ग्रामोन्नतीची शिकवण देणारे थोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील गुरुकुंज आश्रमातील समाधी आणि गादीचे शनिवारी मनोभावे दर्शन घेत त्यांना वंदन केल्यानंतर ‘सेवा परमो धर्मः’ हा मूलमंत्र केंद्रस्थानी ठेवून मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस आ. डॉ. संजय कुटे, खासदार डॉ. अनिल बोंडे, भाजयुमो अध्यक्ष कृष्णराज महाडिक, भाजपा अमरावती ग्रामीण मोर्शी जिल्हाध्यक्ष आ. प्रताप अडसड, आमदार राजेश वानखडे, आमदार चंदू यावलकर, भाजपा अमरावती ग्रामीण मेळघाट जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, अमरावती महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, भाजयुमो अमरावती ग्रामीण मोर्शी जिल्हाध्यक्ष सचिन इंगळे, नितीन गुढदे, आरतीताई वानखडे, जयंत डेहनकर, किरण पातुरकर, बादल कुलकर्णी, चेतन गावंडे, डॉ. संगीताताई शिंदे, चंद्रशेखर भोयर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सुरू असलेल्या वडनगर ते वाराणसी सेवा संकल्प यात्रेचे शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमात आगमन झाले. अमरावती दौऱ्यावर असताना रविंद्र चव्हाण यांनी तिवसा तालुक्यातील शिंदोळा येथे ‘शिंदोळा ते मोझरी भव्य बाईक राली‘ला उपस्थिती दर्शवली. त्यानंतर त्यांनी मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी व गादीचे मनोभावे दर्शन घेत यात्रेत सहभागी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या अभंगांतून जनसहभागातून ग्रामोन्नतीचा विचार मांडला. हाच विचार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवाभावी नेतृत्वातून विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून प्रत्यक्षात येत आहे. सेवाभाव आणि ग्रामविकासाचा हा विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने भाजपा युवा मोर्चाच्या वतीने ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण, सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.