– भारतीय कपास महामंडळाचा उपक्रम
यवतमाळ :- भारतीय कपास महामंडळ (CCI) तर्फे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी “कापूस किसान मोबाईल अॅप” हे नवीन मोबाईल अॅप्लिकेशन सुरु करण्यात आले आहे. हे अॅप शेतकऱ्यांना कापूस हंगामात २४ तास व ७ दिवस उपलब्ध राहणार असून नोंदणी व स्लॉट बुकींग प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरणार आहे.
या अॅपच्या माध्यमातून शेतकरी सहजपणे आपली नोंदणी करून सीसीआय खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी स्लॉट बुकींग करू शकतील. या प्रक्रियेस मदत करण्यासाठी एक विशेष लिंक तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये स्थानिक भाषेत माहिती व मार्गदर्शक व्हिडीओ उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी या लिंकवर जाऊन माहिती पाहावी. https://www.youtube.com/@KapasKisan-Official स्लॉट बुकींग सुविधा ७ दिवसांच्या रोलिंग बेसिसवर खुली राहणार आहे. दररोज एक तारीख बंद होईल आणि त्याच वेळी दुसऱ्या दिवशी नवीन तारीख खुली केली जाईल. उद्घाटनाच्या दिवशी कोणतीही सुट्टी राहणार नाही.
स्लॉट बुकींगची वेळ अकोला आणि औरंगाबाद केंद्रासाठी दररोज सकाळी १०.०० वाजता भारतीय कपास महामंडळाने सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी शक्य तितक्या लवकर आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून, खरेदी केंद्रावर कापूस विक्रीस येण्यापूर्वी स्लॉट बुकींग करावी.




