spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कोदामेंढी जि प हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 83.93%

किशोर साहू, मौदा :– जि प हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोदामेंढीचा बारावीचा निकाल 83.93% लागला. एकूण प्रविष्ठ 56 विद्यार्थ्यांपैकी 47 विद्यार्थी उत्तीर्ण तर 9 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून सृष्टी जयपाल मोटधरे या विद्यार्थिनीने 71.50% गुणसंपदा करून प्रथम क्रमांक, दिपाली देवानंद चाचीरे या विद्यार्थिनीने 68% गुणसंपादन करून द्वितीय क्रमांक तर जानवी नरेश हटवार या विद्यार्थिनींने 67.33% गुण संपादन करून तृतीय क्रमांक पटकावला.

गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय ,तृतीय आलेल्या या विद्यार्थिनींचे मुख्याध्यापक सुरेश ढोके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिक्षिका मोती कौशिक, सदस्य विष्णू बावनकुळे सह इतर सदस्य गण, समस्त शिक्षकवृंद व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.