spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

थकीत वेतनासाठी कामगार आयुक्त कार्यालयाचे महावितरण कंपनीला सक्त निर्देश

मुंबई :- तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनच्या वतीने कामगार आयुक्त, मुंबई कार्यालय येथे कामगार आयुक्त यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून कामगारांचे थकित वेतन प्रकरण अत्यंत गांभीर्याने मांडण्यात आले. बैठकी दरम्यान कामगार आयुक्त कार्यालयाने संबंधित एजन्सीला येत्या २९ मे पर्यंत तीन महिन्यांचे थकीत वेतन तसेच उर्वरित देयके ५ जूनपर्यंत अदा करण्याच्या सक्त सूचना दिल्या. निर्धारित मुदतीत वेतन न दिल्यास महावितरण कंपनीला तपासणी नोटीस काढण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून महावितरण कंपनीमार्फत संबंधित कामगारांचे वेतन अदा करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना कामगार आयुक्त कार्यालयाने दिल्याची माहिती असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

बैठकीमध्ये इतर विविध कामगार विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी असोसिएशन सातत्याने पाठपुरावा करीत राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.या बैठकीस तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने तसेच कार्याध्यक्ष विकी कावळे उपस्थित होते.

Popular Articles