हंसराज,भंडारा लाखनी :- जनावरांना अत्यंत क्रूर वागणूक देत त्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपवर लाखनी पोलिसांनी धाड टाकून एकूण ८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस शिपाई बुधे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बोलेरो पिकअप क्रमांक MH 40 DC 1395 च्या चालकाने वाहनामध्ये १४ गोवंश जातीची जनावरे निर्दयतेने कोंबून नेली होती. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ४० हजार रुपये किमतीची जनावरे आणि ७ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. धक्कादायक बाब म्हणजे, जप्त केलेल्या जनावरांपैकी एक गोवंश मृतावस्थेत आढळला. या प्रकरणी फरार आरोपी चालक सम्राट येवले (वय ३०, रा. गोरेगाव) आणि वाहन मालकाविरुद्ध अपराध क्रमांक ३२४/२०२६ नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५ (अ) (ब), ९ (अ), प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा १९६० चे कलम ११ (१) (अ) (ड) (च) (ज) (झ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२५ व ४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई बुधे यांनी केली असून, लाखनी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
लाखनी पोलिसांची गोवंशाच्या अवैध वाहतुकीवर कारवाई; ८.४० लाखांचा मुद्देमाल जप्त


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



