spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्वर्गीय अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे १३ सप्टेंबरला वितरण

नागपूर :- विदर्भ गौरव प्रतिष्ठान व नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ पत्रकार स्व. अनिलकुमार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘स्वर्गीय अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार’ यंदा रविवार, १३ सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे. पत्रकार क्लब ऑफ नागपूर, सिव्हिल लाईन्स येथील सकाळी १० वाजता. हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. स्वर्गीय अनिलकुमार हे स्वातंत्र्योत्तर काळातील ज्येष्ठ कवी, विचारवंत व पत्रकार म्हणून परिचित होते. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ मागील चार दशकांपासून विदर्भातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी २१ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे आहे. २०२५ वर्षाच्या पुरस्कारासाठी ‘कॅलिफोर्निया टाइम्स’चे मुख्य संपादक गिरीधर भीमरावजी देशमुख (वरूड,जि.अमरावती), पत्रकार व ‘लोकमत’ चे उपमुख्य संपादक असलेले नरेश गणपतराव डोंगरे (नागपूर) तसेच ‘दैनिक लोकसत्ता’चे विदर्भ विभाग विशेष प्रतिनिधी मोहन मनोहर अटाळकर (अमरावती) यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा खा.राजेंद्र जैन यांच्या शुभहस्ते व आ.अरुण लखानी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. उपेंद्र कोठेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.