– स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा सोहळा – डॉ. कापसे
हंसराज प्रतिनिधी भंडारा लाखनी :- स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयात दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कापसे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष नितीन वाघाये उपस्थित होते.
याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे मुख्य लिपिक विलास वाघाये, डॉ. शेंडे , क्रीडा प्रमुख डॉ. सुधीर सहारे, आणि ज्युनिअर महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा. मनीषा सपाटे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनीषा सपाटे यांनी केले. त्यांनी २ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा आढावा घेतला. यामध्ये क्रीडा क्षेत्रात क्रिकेट, कबड्डी, रस्सीखेच, गोळाफेक, १०० मीटर धावणे, स्लो सायकलिंग; सांस्कृतिक क्षेत्रात सोलो डान्स, समूह नृत्य, भावगीत, अंत्याक्षरी, नाटक, वेशभूषा; तसेच बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात रांगोळी, पुष्पगुच्छ सजावट, आणि मेहंदी स्पर्धा अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे विलास वाघाये यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यामुळे त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळते. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण होते आणि हा सोहळा महाविद्यालयाच्या वार्षिक उत्सवाचा एक अविभाज्य भाग आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. कापसे म्हणाले की, “स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा एक अविस्मरणीय सोहळा असतो.” त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा प्रमुख डॉ. सुधीर सहारे यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मेडल, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रांचे वितरण केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके संचालन प्रा. श्रद्धा बोरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रमोद भोयर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समितीच्या डॉ. खाडे , डॉ. धर्मेंद्र सिंग, प्रा. ज्ञानेश्वरी राहंगडाले, प्रा. यशोमती कागदे, प्रा. बोरकर तसेच क्रीडा समितीचे डॉ. सुधीर सहारे, प्रा. कवी सूर्यवंशी, प्रा. स्मिता तितरमारे यांनी परिश्रम घेतले.
तसेच आयोजन समितीमधील डॉ. शेंडे, डॉ. देवघरे, डॉ. टेम्भूर्णे, डॉ. शहारे, डॉ. बबन ढोंगे, डॉ. गीता टिचकुले, डॉ. मंगेश वंजारी, प्रा. तुषार डोंगरवार, प्रा. रूपचंद डोंगरवार, प्रा. मंगेश कुकडे, प्रा. मुनेश्वर हलमारे, प्रा. सागर वारंगणे, प्रा. हर्षा वलथरे, मंगेश बांडेबुचे, राकेश उके, सुनील भोयर, दीपक वाघाये, सचिन बागडे, हेमकृष्ण रांगडाले, गणेश टेकाम, विशाल हनवतकर, विजय शहारे, खेमराज वाघाये व सर्व कर्मचारी वृंदाने सहकार्य केले. समारोपानंतर विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.








