spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचा पुसद दौरा

– वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठांच्या पुरस्कार व सत्कार समारंभास उपस्थित राहणार

यवतमाळ :- माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या ४७ व्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार व सत्कार समारंभासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आज दि. १८ ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार ते पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृह येथे वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानद्वारा दुपारी १२.१५ ते २.३० वाजता आयोजित पुरस्कार व सत्कार समारंभास उपस्थित राहणार आहेत.

यावेळी त्यांच्या हस्ते निवडक कर्तबगार शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ व कृषी उद्योजकांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता माजी आमदार ख्वाजा बेग यांच्या आर्णी येथील निवासस्थानी भेट देतील. तसेच सायंकाळी ५.३० वाजता आर्णीहून नागपूरकडे प्रयाण करतील.

Popular Articles