Home Latest News शेतकरी म्हणून एकत्र येऊन लढा द्या: बच्चु कडु

शेतकरी म्हणून एकत्र येऊन लढा द्या: बच्चु कडु

0
46

28 ऑक्टोबरला मुंबई येथे कर्जमाफी आंदोलन होणार

अमरदिप बडगे,तिरोडा ८ : तिरोडा  कुण्या पक्षाची कुण्या जातीची नाही तर हे आमच्या शेतकऱ्याचे लढाई आहे .त्यासाठी शेतकऱ्यांनी 28 ऑक्टोबरला लढा देण्याकरता कर्जमाफी करीता मुंबईला आंदोलन करण्यात येणारअसल्याने शेतकऱ्यांना यावे. असे आव्हान बच्चू कडू यांनी मुंडीकोटा बाजार चौकात एलगार सभेत सांगितले शेतकरी कर्ज माफी दिव्यांग बांधव भुमिहिन मजुर, मेंढपाळ, असे अनेक प्रश्नाना धरुन मोठेज् आंदोलन मुंबईत करणार असल्याचे बच्चु कडु यांनी एल्गार सभेत यावेळी  सांगितले सर्वात मोठा हा कोण असेल तर हा शेतकरी समाज आहे म्हणून  आपण एक शेतकरी आहोत आणि शेतकरी लढा आपण देणार आहोत यासाठी सर्वांनी शेतकरी बंधाने एकत्र येऊन लढा देण्याकरता 28 ऑक्टोबरला मुंबई येथे एकत्र  या असे सभेला आवर्जुन सांगितले . कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या फोटोला माल्यापण पण तसेच दीपपूजन करून करण्यात आली .मुंडीकोटा येथे   बाजार चौकात एल्गार सभेत विशेष म्हणजे बच्चु कडु बैलगाडीतुन उभे राहून  आणण्यात आले.
यावेळी  सभेला महेंद्र भांडारकर प्रहार जिल्हाध्यक्ष ,पंचायत समिती सदस्य वनिता भांडारकर, प्रहार तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने, संपर्कप्रमुख रमेश कारेमोरे महेंद्र नंदागवळी सचिव, गुंडू बोपचे , रवी फुलजले, वामन हजारे, सुरेन्द्र सुर्यवंशी, तिलक पारधी,  सह प्रहार जनसक्ती पक्षाचे कार्यकर्ते सह महिला व शेतकरी ,युवक यावेळी उपस्थित होते.बच्चू कडू यांनी शाल  श्रीफळ देऊन उत्कृष्ट शेतकरी विनोद काटवले तसेच टोलीराम पटले सत्कार करण्यात आला.अदानी प्रहार संघटना कार्यकत्यानी 28 आक्टोबरच्या मुंबई लढा आंदोलनासाठी 11 हजाराची भेट यावेळी बच्चु कडुला देण्यात आली