spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जीवन विद्या मिशन येथे ज्ञानाची ग्रंथदिंडी

यवतमाळ :- ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा दिव्य संदेश देणारे सद्गुरू वामनराव पै प्रणित जीवन विद्या मिशनचे अनेक उपक्रम होत असतात़या अनषंगाने स्वानंदयोग साधना केंद्र जीवन विद्या मिशन येथे ३ ते ९ जानेवारीदरम्यान ज्ञानाची ग्रंथ दिंडी आयोजित करण्यात आली होती़.

सद्गुरू वामनराव पै यांची ग्रंथसंपदा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणे आणि त्या घरात ज्ञानाचे वाटप करणे असाच ग्रंथदिंडीचा अमोल ठेवा आहे़ याच अनुषंगाने मुंबईहून १९ नामधारक यवतमाळ स्वानंदयोग साधना केंद्र जीवन विद्या मिशन येथे ३ ते ९ जानेवारीदरम्यान शाळा व कॉलेजमध्ये मार्गदर्शन व संध्याकाळी प्रवचन असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले़ या आठ दिवसादरम्यान यवतमाळकरांची १५ नामधारकांची फळी बरोबर घेऊन ही ज्ञानाची दिंडी पार पडली़ सदर कार्यक्रम नवी मुंबई, नेरूळ ज्ञानसाधना केंद्र व यवतमाळ स्वानंद योग साधना केंद्रातील नामधारकांनी यशस्वीरीत्या पार पडला़ यावेळी प्रवचनकार सीआयओ बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे सदस्य, जीवनविद्या फाउंडेशनचे संचालक माजी अध्यक्ष सुभाष केळकर यांनी सांगितले की, ‘शरीर साक्षात परमेश्वर, सुखाला कारण विचार व दु:खाला कारण अविचार’ या विषयावर मार्गदर्शन केले़ कांचन पालव यांचे ‘विश्व प्रार्थनेचे महत्त्व व कृतज्ञता’ या विषयावर मार्गदर्शन केले़ विविध शाळांमध्ये सरिता चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले़ यवतमाळमध्ये विविध ठिकाणी हे कार्यक्रम करून यवतमाळकरांसाठी एक ज्ञानाची पर्वणीच आणल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले़ कार्यक्रमाचे आयोजन जीवनविद्या फाउंडेशनचे प्रवचनकार सुभाष केळकर यांनी केले होते़.

Popular Articles