नागपूर :- गांधीनगर येथील हनुमान मंदिराच्या पटांगणात पारंपरिक तान्हा पोळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ११ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमाला परिसरातील बालगोपालांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. तान्ह्या पोळ्या निमित्त लहान मुलांनी आकर्षक सजविलेले नंदीबैल घेऊन सहभाग नोंदविला. विविध वेशभूषा आणि नंदीबैलांच्या आकर्षक सजावटीमुळे कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पश्चिम नागपूर- धरमपेठ मंडळ भाजपाचे कोषाध्यक्ष बिपिन गिरडे यांच्या नेतृत्वाखाली तान्ह्या पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील बालगोपालांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून तसेच नंदीबैलांना आकर्षक सजावट करून कार्यक्रमात सहभाग घेतला. बालगोपालांच्या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारची पारितोषिके व बक्षिसे ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला तो बी.आर.मुंडले हायस्कूलमध्ये शिकणारा ७ वर्षीय विद्यार्थी, अक्षत स्मित टिचकुले अक्षतने वेशभूषा तसेच नंदीबैल सजावट या दोन्ही प्रकारांत उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकाविला. त्याने साकारलेल्या वेशभूषेत अयोध्येचे प्रभू श्रीराम यांची भूमिका सादर केली होती. श्रीरामाच्या वेशभूषेत सजलेल्या अक्षतने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अक्षतच्या या कलात्मक सादरीकरणाचे उपस्थित मान्यवर व नागरिकांनी कौतुक करून अभिनंदन केले. लहान वयात धार्मिक आणि पारंपरिक संस्कृतीशी जोडलेले सादरीकरण केल्याबद्दल त्याचे विशेष कौतुक करण्यात आले. तान्हा पोळा हा लहान मुलांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि शेतीशी संबंधित बैलांविषयीची कृतज्ञता जपण्याचा विदर्भातील महत्त्वाचा उत्सव मानला जातो. या निमित्ताने बालगोपालांना पारंपरिक सणांचे महत्त्व समजावे आणि त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. गांधीनगरात तान्ह्या पोळ्यात बालगोपालांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः प्रभू श्रीरामाची वेशभूषा साकारत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या अक्षत स्मित टिचकुलेच्या सादरीकरणाने यंदाच्या तान्ह्या पोळ्याची विशेष आठवण नागरिकांच्या मनात राहिली.
गांधीनगरच्या तान्ह्या पोळ्यात अयोध्येचे प्रभू श्रीराम अवतरले


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.




