spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महाराष्ट्र अंनिस चा जिल्हा प्रेरणा मेळावा.

 

नागपूर 30 : (२९-६-२०२५) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा प्रेरणा मेळावा दर चार महिन्यांनी येत असतो. नुकतीच शहादा येथील राज्य कार्यकारिणीची तीन वर्षाकरिता निवड झाल्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये प्रेरणा मेळाव्याचे जिल्हास्तरीय आयोजन करण्यात आले.
यावेळी नागपूर विभागीय राज्य उपाध्यक्ष पदावर संजय शेंडे यांची निवड झाल्याच्या सन्मानार्थ जिल्हा अध्यक्ष जगजीत सिंग, राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर धंदरे, सेवकराम राऊत यांच्या उपस्थितीमध्ये शाल पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक पर भाषणामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष गौरव आळणे यांनी जिल्ह्यातील मागील चार महिन्यात झालेल्या उपक्रमांची माहिती दिली तर पुढील चार महिन्याचे नियोजन नियोजन करण्यात आले. तसेच शहादा येथील राज्य कार्यकारणी मध्ये झालेली निर्णय व नवनियुक्त राज्य पदाधिकाऱ्यांची माहिती दिली.
यावेळी शाखा प्रतिनिधींनी आपापल्या मात्रु शाखेमध्ये राबविण्यात आलेले उपक्रम , येणाऱ्या अडचणी, सूचना बाबत माहिती दिली.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जगजीत सिंग यांनी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घराच्या दारावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पाटी लावावी. तसेच प्रत्येक कार्यकर्त्याने  अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका मुखपृष्ठाचे सभासद बनण्याचे आव्हान केले.
बैठकीला जिल्हा विभाग प्रमुख अशोक पाटील, मालती वराडे, रवींद्र राऊत, पृथ्वीराज शाम, मनोहर कापसे, संजय भलमे, शाखा पदाधिकारी संजय लाडे, संजय भुरे, ताराचंद पखिडे, केवळराम वानखेडे, बबन गायकवाड, विलास भालेराव, सुधा बामनपल्लीवार, दीपिका अडागळे, यथार्थ आडागळे,  ईश्वर डहाके, दिवाकर शिर्के, अनिल डोंगरे, चंद्रशेखर पाटील, रजनी सुरकार, संजय रेवतकर उपस्थित होते. बैठकीचे संचालन जिल्हा प्रधान सचिव विनोद वि पवार यांनी केले तर आभार जिल्हा युवा कार्यवाह मनीषा आढागळे यांनी मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.