Home Latest News महाराष्ट्राला राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत केंद्राच्या हिस्स्याच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये एकूण 1,566.40 कोटी...

महाराष्ट्राला राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत केंद्राच्या हिस्स्याच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये एकूण 1,566.40 कोटी रुपये निधी मंजूर

0

<p><strong>नवी दिल्ली &colon;-<&sol;strong> केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री अमित शाह यांनी वित्त वर्ष 2025-26 साठी महाराष्ट्र राज्याला राज्य आपत्ती प्रतिसाद निधी &lpar;SDRF&rpar; अंतर्गत केंद्राच्या हिस्स्याच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये एकूण 1&comma;566&period;40 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे&period; यंदाच्या मान्सून काळात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तात्काळ मदत आणि पुनर्वसनासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार नैसर्गिक आपत्तींच्या काळात राज्य शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे&period; गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार हा निधी मंजूर करण्यात आला आहे&period; चालू वर्षात केंद्र सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी&lpar;SDRF&rpar;अंतर्गत 27 राज्यांना 13&comma;603&period;20 कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी &lpar;NDRF&rpar; अंतर्गत 15 राज्यांना 2&comma;189&period;28 कोटी रुपये वितरित केले आहेत&period; याशिवाय&comma; राज्य आपत्ती न्यूनीकरण निधी &lpar;SDMF&rpar; मधून 21 राज्यांना 4&comma;571&period;30 कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती न्यूनीकरण निधी &lpar;NDMF&rpar; मधून 9 राज्यांना 372&period;09 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>पूर&comma; भूस्खलन आणि ढगफुटी यांसारख्या आपत्तींमुळे प्रभावित राज्यांना सर्वतोपरी सहाय्य पुरवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे&period; या संकटकाळात केंद्राने आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष उपाययोजना राबवल्या असून&comma; तात्काळ मदत कार्याला गती दिली आहे&period;यंदाच्या मान्सून काळात&comma; महाराष्ट्रासह देशभरातील 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बचाव आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफ&lpar;NDRF&rpar; च्या विक्रमी 199 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या&period; पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्रांमध्ये केंद्र सरकारने एनडीआरएफ &lpar;NDRF&rpar;&comma; सैन्य आणि वायुसेनेच्या तैनातीमार्फत सर्व आवश्यक सहाय्य पुरवले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version