Home Latest News देशात महाराष्ट्राला ‘स्वच्छ भारत मिशन’ मध्ये अग्रक्रमावर आणावे – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

देशात महाराष्ट्राला ‘स्वच्छ भारत मिशन’ मध्ये अग्रक्रमावर आणावे – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबवणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये प्रभावी काम करून देशांमध्ये राज्याला अग्रस्थानी आणण्यासाठी प्रयत्न करावेत&comma; असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>मंत्रालयात स्वच्छ भारत मिशनच्या आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते&period; बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे&comma; जलजीवन मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई&period; रवींद्र&comma; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नाईक आणि अतिरिक्त मिशन सचिव शेखर रौंदळ सहसचिव डॉ&period;बी&period;जी&period; पवार&comma; मुख्या अभियंता प्रशांत भामरे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळवावा&comma; यासाठी सर्वांचे समन्वय व एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे&period; या उद्दिष्टासाठी स्वयंसेवी संस्था&comma; कर्मचारी तसेच महिला बचत गटांचा सहभाग वाढविणे महत्त्वाचे आहे&period; त्यांच्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करून स्वच्छतेबाबत जागरूकता आणि सहभाग वाढवावा&comma; असे सांगून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की&comma; मिशन अंतर्गत असलेली सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत&period; सार्वजनिक शौचालयांची कामे गतीने पूर्ण व्हावीत&period; स्वच्छतेसाठी लागणाऱ्या जागा स्थानिक पातळीवर समुपदेशनाद्वारे उपलब्ध करून घ्याव्यात&period; तसेच वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोडवाव्यात&period;<&sol;p>&NewLine;<p>मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्याचा निधी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आणि कोणत्याही कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचेही स्पष्ट सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी स्वच्छता ही सेवा&comma; घनकचरा व्यवस्थापन&comma; सांडपाणी व्यवस्थापन&comma; हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गावे निर्माण करणे&comma; प्लास्टिक कचरा व्यवस्थापन&comma; गोबरधन प्रकल्प&comma; मैलागाळ व्यवस्थापन&comma; वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्याच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करून महाराष्ट्राला स्वच्छ भारत मिशन मध्ये देशात अग्रक्रमावर आणावे&comma; असे आवाहन मंत्री पाटील यांनी यावेळी केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version