spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्राचा आवाज सातासमुद्रापार: आमदार डॉ. परिणय फुके यांचे इंग्लंडमधील वेल्स विद्यापीठात ‘सुशासन’वर मार्गदर्शन

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- राज्याचे माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार डॉ. परिणय फुके यांची निवड इंग्लंडमधील प्रख्यात वेल्स विद्यापीठाने एका विशेष चर्चासत्रासाठी केली आहे. १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान आयोजित या चर्चासत्रात डॉ. फुके “सुशासन व सार्वजनिक धोरण” (Good Governance and Public Policy) या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ही निवड केवळ विदर्भासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद मानली जात आहे.

वेल्स विद्यापीठातर्फे महाराष्ट्र विधिमंडळाच्या काही निवडक सदस्यांसाठी या खास चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या ‘लॅम्पिटर कॅम्पस’मध्ये हा पाच दिवसीय कार्यक्रम पार पडणार आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी डॉ. फुके १५ फेब्रुवारी रोजी लंडनला पोहोचणार आहेत.

डॉ. परिणय फुके यांची शैक्षणिक आणि राजकीय कारकीर्द अत्यंत प्रभावशाली राहिली आहे. त्यांनी एमबीए (MBA) आणि पीएचडी (PhD) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून, प्रशासकीय कामकाजाची त्यांना सखोल जाण आहे. नागपूर महानगरपालिकेतून नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणाऱ्या डॉ. फुके यांनी नंतर विधान परिषदेतही आपल्या कार्याचा ठसा उमटवला.

राज्यातील अनुभवाचा उपयोग जागतिक स्तरावर

राज्यमंत्री म्हणून त्यांनी सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास आणि वने यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. प्रशासनातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि सार्वजनिक धोरणांमधील त्यांची तज्ज्ञता यामुळे त्यांचे वेल्स विद्यापीठातील भाषण हे आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे.

लोकशाहीमध्ये सुशासन कसे राबवावे आणि सार्वजनिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, याबाबतचे डॉ. फुके यांचे विचार जागतिक व्यासपीठावर मांडले जाणार असल्याने राजकीय क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.

Popular Articles