नागपूर :- महासम्राट बळीराजा राष्ट्र सेवा संघाच्या वतीने ११ ऑक्टोबर पासून तर १४ ऑक्टोबर पर्यंत महासम्राट बळीराजा रथयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. तीर्थक्षेत्र गुरुकुंज मोझरी ते शिवतीर्थ उमरी -सावनेर अशी ही रथयात्रा अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या चार जिल्ह्यातून मार्गक्रमण करेल. वं. तुकडोजी महाराजांना पुण्यतिथी दिनानिमित्ताने अभिवादन करून यात्रेचा शुभारंभ राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज, खासदार बळवंत वानखेडे, आमदार संजय खोडके, माजी आमदार यशोमती ठाकूर, आमदार बच्चू कडू, आमदार सुलभा खोडके, आमदार राजेश वानखेडे, रविंद्र शिंदे, प्रेमकुमार बोके यांचे शुभहस्ते होईल. सिंधू (शिव) संस्कृतीचा महानायक, स्वामी तिन्ही जगाचा, महासम्राट बळीराजा फक्त कृषी/शेतकरी नव्हे तर व्यापार, तंत्रज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, समृद्ध करणारा, सर्वांचा, आत्ताच्या समस्त जातींचा, समस्त भारतीयांचा कुलस्वामी, रक्षक, प्रजाहितदक्ष, समतावादी न्यायी, महादानशूर, संविभागी, अलिखित संविधान देणारा पहिला महासम्राट आहे. दिवाळीला “इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो” म्हणून आजही समस्त भारतीय विविध सणाद्वारे जवळ जवळ तीन हजार वर्षापासून आठवण करतात. म्हणून महाराष्ट्रात बलिप्रतिपदेच्या दिवशी महासम्राट बळीराजाचे सामूहिक पूजन व मिरवणूक काढून बलिप्रतिपदा दिन साजरा करावा व नवीन पिढीला बळीराजाच्या कार्याचा प्रचार प्रसार व्हावा व राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत व्हावी या हेतूने विविध संघटनांच्या सहकार्याने रथयात्रेचे आयोजन केलेले आहे. रथयात्रेमध्ये महासम्राट बळीराजाच्या मूर्तीचा रथ, जिजाऊ शिवबा मूर्तीचा रथ, झांकी, ढोल ताशा, पथनाट्य, गाण्यांचा कार्यक्रम हे यात्रेचे विशेष आकर्षण असेल.रथयात्रेसाठी सर्वश्री अभिविलास नखाते, सेवकराम राऊत, योगराज धानोरकर, दिनेश इंगोले, नरेंद्र गद्रे, पांडुरंग भोंगाडे, प्रमोद वैद्य, उमेश कोराम, भगवान चांदेकर, सुजित मेश्राम, सचिन पराये, जितेंद्र पर्वते, प्रशांत येनगंदेवार अथक परिश्रम घेत असून अभीविलास नखाते यांनी पत्रकारांना माहिती दिली. सोबतच संभाजी ब्रिगेडचे सुधांशू मोहोड उपस्थित होते.



