यवतमाळ, १२ : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, यवतमाळ येथे महामंडळाचा ४७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा व्यवस्थापक मुकेश सोनकुसरे यांनी जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबतची माहिती दिली.
यावेळी त्यांनी लाभार्थ्यांना वसूली विहीत मुदतीत भरणा करून सिबील रेकॉर्ड चांगले करण्याचे आवाहन केले. अन्यथा संबंधित लाभार्थ्यांना इतर कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळणार नाही. तथापि कर्जाची नियमित परतफेड करून महामंडळाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांना महामंडळातील योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक मुकेश सोनकुसरे यांनी केले आहे.




