शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले महायुती सरकार – माजी जि प सदस्या राधा मुकेश अग्रवाल

0
4

किशोर साहू, मौदा :- नागपूर जिल्ह्यासह राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ (Trigger-1 पहिली कळ) जाहीर करून  यंदाच्या खरिपाच्या हंगामात पावसाच्या खंडामुळे आणि अपुऱ्या पावसामुळे अडचणीत आलेल्या बळीराजाला मोठा दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा शासन निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे मत खात – रेवराल जिल्हा परिषद सर्कलच्या माजी जिल्हा परिषद सदस्या राधा मुकेश अग्रवाल व माजी भाजपा मौदा मंडळ अध्यक्ष मुकेश अग्रवाल यांनी व्यक्त केले व  या सर्वसमावेशक निर्णयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनापासून आभार म्हणून अग्रवाल दांपत्य पुढे म्हणाले की, काही वृत्तपत्रांमध्ये विरोधकांकडून केवळ प्रसिद्धीसाठी व राजकारणासाठी सरकारवर टीका केली जात आहे. परंतु, विरोधक फक्त कागदी आरोप करत असताना, आमच्या सरकारने मात्र कुठलाही वेळ न घालवता थेट प्रत्यक्ष पावले उचलली आहेत. शासनाने केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात सवलती व उपाययोजना ताबडतोब लागू केल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येवर संवेदनशीलता दाखवत विरोधकांच्या निराधार टीकेला आमच्या सरकारने कर्तृत्वाने आणि धोरणात्मक निर्णयांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. बळीराजाचे हित हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.