spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनानिमित्त ममता HIMC संस्थेचा उपक्रम

नागपूर :- जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवसानिमित्त ममता HIMC या संस्थेच्या वतीने आज एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश समाजात मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि विशेषतः महिलांच्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष वेधणे हा होता. कार्यक्रमाला ममता HIMC संस्थेच्या राज्य समन्वयक पल्लवी भांडारकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाचे मार्गदर्शन समुपदेशिका सुरभी पानपालिया यांनी केले. यावेळी ICDS केंद्राच्या सेविका देखील उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात गर्भवती माता, स्तनदा माता, नवविवाहित दांपत्ये आणि किशोरी मुली सहभागी झाल्या होत्या. त्यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व, ताणतणाव व्यवस्थापन, तसेच सकारात्मक जीवनशैली कशी ठेवावी याबाबत मार्गदर्शन देण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन योगेश राठोड आणि मंजुषा नासरे यांनी केले होते. या कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मानसिक आरोग्य जपण्याचा संकल्प व्यक्त केला.

Popular Articles