spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चंद्रपूर मनपा स्थायी समिती सभापतिपदी मनस्वी संदीप गिऱ्हे यांची निवड

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी मनस्वी संदीप गिऱ्हे यांची निवड करण्यात आली. सोमवार, दि. १६ मार्च रोजी मनपा राणी हिराई सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी निकाल जाहीर केला.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी दि. १३ मार्च रोजी एकूण ३ अर्ज दाखल करण्यात आले होते. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून मनस्वी संदीप गिऱ्हे यांचे २ अर्ज तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे वसंत राजेश्वर देशमुख यांचा १ अर्ज प्राप्त झाला होता.

सोमवारी दुपारी १ वाजता विशेष बैठकीची कारवाई सुरू करण्यात आली. सभेची सुरुवात झाल्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. वैध उमेदवारांना नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला. या कालावधीत कुणीही अर्ज मागे न घेतल्याने हात उंचावून मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली.

मतदानामध्ये मनस्वी संदीप गिऱ्हे यांना ८ तर वसंत राजेश्वर देशमुख यांना ८ अशी समसमान मते प्राप्त झाली. त्यामुळे नियमानुसार ईश्वर चिट्ठीद्वारे निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली. या प्रक्रियेत मनस्वी संदीप गिऱ्हे यांच्या नावाची चिट्ठी निघाल्याने जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी त्यांना चंद्रपूर महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती म्हणून घोषित केले.

Popular Articles