spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाची कारवाई; ३० व्यावसायिक मालमत्ता सील

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेकडून मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मालमत्ता करापोटी शहरातील मालमत्ता धारकांकडून एकूण ७८ कोटी रुपयांची मागणी असून आजपावेतो ३६ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. अद्याप ४२ कोटी रुपयांची मोठी थकबाकी बाकी आहे.

ही थकबाकी वसूल करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे १५ विशेष वसुली व जप्ती पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके शहरातील विविध भागांमध्ये जाऊन थकीत करदारांकडून वसुलीची कारवाई करीत आहेत. कर थकबाकीदारांना वेळोवेळी नोटीस देऊनही कर न भरल्यास संबंधित मालमत्तांवर जप्ती व सील करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ३० व्यावसायिक मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. मनपाकडून थकीत कराची वसुली करण्यासाठी पुढील काळातही अशा प्रकारची कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महानगरपालिकेने सर्व मालमत्ता धारकांना आपली मालमत्ता कराची थकबाकी तात्काळ भरून मनपाला सहकार्य करावे, अन्यथा नियमानुसार जप्ती व इतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.