किशोर साहू, मौदा ,ता.३:- खात येथे मंडई उत्सव नुकताच साजरा करण्यात आला. मंडईची सुरुवात आमदंगलीने करण्यात आली.
मंडई निमित्त नाटक”इन्सान कि जंग उर्फ बदले कि आग”, “राजा हरिश्चंद्र”,बॉलिवूड डान्स ग्रुप हंगामा ,केसर लावणी डान्स ग्रुप चा लावणी कार्यक्रम, दंडार अशा सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि शांत वातावरणात पार पडले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती खात – रेवराल जि प सर्कल च्या माजी जि.प. सदस्या राधा मुकेश अग्रवाल, भा.ज.पा. तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल, पं.स. मौदा माजी सभापती राजकुमार ठवकर, स्वप्निल श्रावणकर, ग्रामपंचायत खात माजी सरपंच कैलाश वैद्य, उपसरपंच रविंद्र मंडारकर, ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम शर्मा, अरविंद तंबूलकर, शैलेश गिरीपुंजे , शिवसेना पदाधिकारी लोकेश राखडे सह इतर मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी सर्व मान्यवरांनी गावातील सांस्कृतिक परंपरा जपण्याचे आणि नव्या पिढीला कलाविषयक प्रेरणा देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.




