– कृषी क्षेत्रामध्ये आदर्श व्यक्तिमत्वाची उभी केलेली छाप !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :- मोर्शी तालुक्यातील कृषी विभागात कार्यरत असलेले मंडळ कृषी अधिकारी आज शेतकऱ्यांसाठी केवळ अधिकारी न राहता मार्गदर्शक, आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान बनले आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे संपूर्ण तालुक्यात त्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करणे, शेतात प्रत्यक्ष जाऊन मार्गदर्शन करणे आणि शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, ही त्यांची खास ओळख बनली आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान तसेच विविध कृषी योजनांबाबत त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे अनेक शेतकरी आत्मनिर्भर बनत आहेत.
विशेष म्हणजे, त्यांनी केवळ कागदावर काम न करता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष काम केले, त्यामुळे त्यांच्या कामाचा थेट परिणाम उत्पादन वाढीत आणि उत्पन्नात दिसून येत आहे.
आजच्या यंत्रणेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कार्यालयाच्या दारात हेलपाटे मारावे लागतात, मात्र अशा परिस्थितीत हा अधिकारी स्वतः शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी सोडवत असल्याने ते एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले आहेत.
विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येकडे त्यांनी गांभीर्याने पाहत त्वरित उपाययोजना केल्या. त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे.
आजच्या यंत्रणेत अनेक वेळा शेतकऱ्यांना कार्यालयीन अडथळ्यांना सामोरे जावे लागते, मात्र या अधिकाऱ्यांनी ही पद्धत बदलत “अधिकारी शेतकऱ्यांच्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आल्यामुळे मोर्शी तालुक्यात मोहन फुले यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
मंडळ कृषी अधिकारी मोहन फुले यांच्या कार्यामुळे केवळ योजनांची अंमलबजावणी झाली नाही, तर शेतकऱ्यांच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडून आला. आत्मविश्वास वाढला आणि शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असल्यामुळे अशा प्रामाणिक व शेतकऱ्यांच्या सेवेत तत्पर असणाऱ्या अधिकाऱ्याची प्रशासनाने पदोन्नती करून मंडळ कृषी अधिकारी या पदावर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात बदली केल्यामुळे मोहन फुले यांना मंडळ कृषी अधिकारी मोर्शी या पदावर पुन्हा मोर्शी तालुक्यात देण्यात यावे अशी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जोरदार मागणी होत आहे.




