spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हलबा समाज महासंघातर्फे सामूहिक विवाह सोहळा आज

नागपूर :- हलबा समाज महासंघ, दीनदयाल नगर, नागपूर यांच्या वतीने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी निःशुल्क सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन आज, शनिवार दि. 20 जून रोजी सायंकाळी 7 वाजता. हलबा समाज महासंघ सांस्कृतिक भवन परिसर, दीनदयाल नगर येथे करण्यात आले आहे. या सोहळ्यास आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार विकास कुंभार, धनराज कुंभारे हिंगणघाट, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडदे पाटील तसेच हलबा समाज महासंघाचे माजी अध्यक्ष देवराव नांदकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

समाजात साधेपणा, समानता व सामाजिक समरसता वाढीस लागावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी हलबा समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा.डॉ. देवराम नंदनवार, महासचिव डॉ. रमेश पराते व विवाह समितीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत, अशी माहिती महासंघाचे सल्लागार अनिल नंदनवार यांनी दिली.

Popular Articles