spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

संविधान दिनानिमित्त मंत्रालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

मुंबई :- संविधान दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी दत्तात्रय शिंदे, सहायक कक्ष अधिकारी अमोल चव्हाण, सुनील जाधव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मंत्रालयातील संविधान मंदिरात पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Popular Articles